सफर धबधब्यांची

पावसाळ्यात व पर्जन्यकाळ ओसरल्यानंतर पर्यटकांना धबधबे खुणाऊ लागतात. अनेक कुटुंबे, कॉलेज ग्रुप्स, फ्रेंड सर्कल्स या काळात धबधब्याचं प्लॅनिंग करतात. अशाच धबधब्यांचा मनसोक्त आनंद देण्यासाठी बर्की, राऊतवाडी, रामणवाडी इत्यादी धबधब्यांव्दारे कोल्हापूर सज्ज आहे.
============================================= -->
Standard Post with Image

धावपळीच्या जगापासून दूर, निसर्गरम्य बर्की धबधबा

कोल्हापूरातील सर्वात लोकप्रिय असा हा धबधबा आहे. बर्की धबधबा म्हणजे कोल्हापूरची शान आहे. ह्या धबधब्याला दिलेली भेट ही अलौकीक आनंदाची पर्वणी ठरते. हा नजारा इतका सुंदर आहे की कधी तो नजारा कॅमेराबध्द होतो लक्षात येत नाही. धबधब्याकडे जाताना निसरडे रोड, शेवाळलेले दगड, मध्येच पडणारा पाऊस हे सर्व रोमांचकारी आहे. धबधब्याजवळ पोहचल्यावर हा धबधबा भव्य आहे हे जाणवतो. प्रचंड मोठा पाण्याचा प्रवाह इथे कोसळत असतो. आपण आपली सुरक्षा बाळगून पाण्यात उतरुन मनसोक्त डुबायचं, पोहायचं, पाण्याचे तुषार अंगावर घ्यायचे, खुप मज्जा करायची.

Standard Post with Image

सुपर राऊतवाडी धबधबा

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालूक्यामध्ये असलेला राऊतवाडी धबधबा अल्पावधीत पर्यटकांमध्ये लोकप्रिय झालेला आहे. अतिशय उंचावरुन प्रचंड जल प्रपात धबधबा रुपात खाली पडत असतो. इथला निसर्गरम्य परिसर मनाला नक्कीच भावतो. रिमझिम पावसाचा अनुभव घेत हिरवीगार भात शेती पाहत या धबधब्याला जाताना खुप मज्जा येते.

*कसं जायचं - कोल्हापूर शहर - राधानगरी - ३ किमी पासून उजव्या हातास वळण - राऊतवाडी (७० किमी)
Standard Post with Image

आडवाटेवरचा रामणवाडी धबधबा

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालूक्यात दाजीपूरच्या धनदाट अरण्यात गव्यांच्या सानिध्यात हा धबधबा आहे. राधानगरीतील रामणवाडी या छोट्याशा वाडीजवळ हा जबरदस्त धबधबा कोसळत असतो. हा धबधबा निसर्गाच्या अगदी कुशीत वसलेला आहे. इथे येणं विलक्षण रोमांचकरी ठरतं. पावसाळ्यात खाली आलेले ढग या ढगांमधून चाललेला उन सावलीचा खेळ, हिरवंगार दाजीपूरचं घनदाट जंगल अशा या वातावरणात स्वतःलाही विसरण्याची ताकद आहे.

सुंदर रामतीर्थ धबधबा

आजरा तालूक्याच्या एस.टी. स्थानकापासून ४ किमी अंतरावर हा धबधबा आहे. हा धबधबा मनोहारी ठरतो. प्रचंड फेसाळत असलेलं वाहतं पाणी पाहत असताना एक वेगळीच मज्जा येते. या ठिकाणी मस्त फोटोसेशन करता येते. या ठिकाणी आपण उन्हाळ्यात सुध्दा भेट देऊ शकतो इतकं सुंदर आहे हे. इथे फक्त धबधबाच पहावा एवढंच नाही बर का, इथे आपण जरुर पहावा ६ फुट उंचीचा दगडी नंदी सुंदर आहे. त्याचबरोबर इंग्रजांच्या काळातील दगडी व्हिक्टोरिया पूल सुध्दा पाहता येतो.

Standard Post with Image

निसर्गाच्या सानिध्यात मानोली धबधबा

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आंबा या निसर्गरम्य गावाजवळील मानोली डॅमजवळ हा सुंदर धबधबा आहे. मानोली जरी छोटा असला तरी पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. संपूर्ण कुटुंबासहित पर्यटक येथे धबधब्याचा आनंद घेत असतात. येथील मानोली डॅम व त्याभोवती असणारा निसर्ग न्याहाळताना मन प्रसन्न होत. कुटुंबाला रिफ्रेश करण्यासाठी या धबधब्याला भेट द्यायला हवे.

Standard Post with Image

इतर धबधबे

चंदगड तालूक्यातील तिलारी डॅमजवळ स्वप्नवेल पॉईंटवरुन दिसणा-या २४ धबधब्यांचा सुंदर नजारा

दोनवडे व नितवडे येथील धबधबे

कोरोचीं धबधबा, हातकणंगले

केगद, कुंभवडे धबधबे, चंदगड

Made Packages For You. Start Making Your Travel Plans Check Out here