या इमारतीची रचना ब्रिटीश चार्ल्स माँट यांनी गॉथिक शैलित केली आहे. इमारत देखणी असून इमारतीच्या बाहेरील बाजूचे कोरीव काम मस्तच आहे. टाऊन हॉल ही इमारत कोल्हापूरातील हेरिटेज बिल्डींग आहे. स्थापत्त शास्त्राचा उत्तम नमूना आहे. या संग्रहालयात वेगवेगळ्या दालनांमध्ये अनेक वस्तूंचा संग्रह केला आहे, त्यामध्ये भाले, बंदूका, वेगवेगळी चित्रे, सुंदर भांडी, छ. शाहूंच्या काही वस्तू तसेच समुद्गदेवतेचा पुतळा, ब्रह्मपूरी तसेच इतर ठिकाणावरील उत्खननातून सापडलेल्य मुर्त्या, दगडाची भांडी, शस्त्रात्रे, ताम्रपट, शिलालेख, चिनी मातीच्या कलाकुसरी इ. अनेक वस्तूंनी हे संग्रहालय श्रीमंत आहे. अंतर्गत सजावट, लाईट इफेक्ट सुंदरच आहे.
*कसं जायचं - मुख्य बसस्थानक-दसरा चौक- टाऊन हॉल संग्रहालय (३ किमी)संग्रहालये
विविध गोष्टींचे जतन करुन त्याव्दारे सत्य इतिहासावर प्रकाश टाकण्याचे काम संग्रहालयाव्दारे केले जाते. आज भारतात अनेक संग्रहालयाव्दारे हे काम उत्तमरित्या केले जात आहे. कोल्हापूरात छ. शहाजी वस्तू संग्रहालय, टाऊन हॉल, चंद्गकांत मांडरे, जी. कांबळे इ. संग्रहालयाव्दारे राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक इत्यादी गोष्टींचे जतन करण्यात आले आहे. कोल्हापूरातील संग्रहालयाव्दारे जतन करुन ठेवलेल्या या मौलिक ठेव्याचा अनुभव घेण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध आहे.शहरांतर्गत ऐतिहासिक स्थळे...
एक ग्रेट अनुभव, छ.शहाजी वस्तू संग्रहालय (न्यू पॅलेस)
या संग्रहालयाची सुरुवात छ. शहाजी महाराज यांनी राजर्षि छ. शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त सन १९७४ साली केली. यासाठी श्रीमंत छ.शहाजी महाराजांनी आपल्या संग्रहालयातील अनेक दुर्मिह मौल्यवान वस्तूंचा संग्रह तसेच आपल्या राहत्या राजवाड्याचा पहिला मजला संग्रहालयासाठी दिला. न्यू पॅलेस हा अतिशय देखणा व विलोभनीय असून कोणीही याच्या प्रेमात पडेल असे या राजवाड्याचे काम आहे.
*कसं जायचं - मुख्य बसस्थानक - दसरा चौक - महावीर कॉलेज - नवा राजवाडा (न्यू पॅलेस) ३ किमीएक परिपूर्ण कलादालन - चंद्गकांत मांडरे आर्ट गॅलरी
कोल्हापूर शहरातील राजारामपूरी ७ व्या गल्लीतील या आर्ट गॅलरीला भेट देणे अविस्मरणीय ठरते. सिने अभिनेते चंद्गकांत मांडरे यांनी मराठी चित्रपट सृष्टी आपल्या जबरदस्त अभिनयाने गाजवली. ते उत्तम अभिनेते तर होतेच त्याचबरोबर एक उत्कृष्ट चित्रकारसुध्दा होते.
कसं जायचं - मुख्य बस स्थानक - राजारामपूरी ७ वी गल्ली - चंद्गकांत मांढरे आर्ट गॅलरी, २ किमी.कलायोगी जी. कांबळे आर्ट गॅलरी
जी. कांबळे म्हणजेच गोपाळराव बळवंतराव कांबळे हे एक कोल्हापूरचे सुप्रसिध्द चित्रकार होते त्यांनी चित्रकारीतीने अनेकांना अचंबित केले आहे. त्यांच्या आयुष्यातील माइलस्टोन ठरलेला चित्रपट मुघल ए आजम याचं पोस्टर सिने जगतात लोकप्रिय आहे. जी. कांबळेंनी लहानपणी चित्रकलेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना अतिशय कष्टातून चित्रकला आत्मसात केली. पूढे त्यांनी शकुंतला, दहेज, रोटी, झनक-झनक पायल बाजे, मुघल ए आजम व इतर अनेक चित्रपटांच्या पोस्टरमध्ये आपले योगदान दिले आहे.
*कसं जायचं -मुख्य बसस्थानक - दसरा चौक - बिंदू चौक - खासबाग मैदान कलायोगी जी कांबळे आर्ट गॅलरी. (३ किमी)ग्रामीण बाज जपणारे सिध्दगिरी म्युझिअम
इथले संग्रहालय शिल्पकलेचा एक उत्तम उदाहरण आहे. प्राचीन भारतातील महान ऋषिमुनींची माहिती तसेच ग्रामीण भागातील जीवनशैलीची माहिती इथे शिल्परुपी मिळते. येथील शिल्पे इतकी जीवंत वाटतात की, आपण एका खरोखरच्या गावामध्ये प्रवेश केला आहे असेच वाटते. या म्युझिअममध्ये भारतातील वेगवेगळ्या परंपरेचे दर्शन होत इथं दिलेली भेट लक्षात राहते.
*कसं जायचं -मुख्य बसस्थानक - कागल रोड-गोकुळ शिरगांव-कणेरी मठ (७ किमी)छ. शाहू जन्मस्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस
याच पॅलेसमध्ये २६ जून १८७४ रोजी राजर्षि छ. शाहू महाराजांचा जन्म झाला. या ठिकाणी आपणांस कोल्हापूर परिसरातील उत्खननांत मिळालेल्या वेगवेगळ्या वस्तूंचा संग्रह आहे. त्यामध्ये वेगवेगळी शिल्पे, कलाकृती तसेच शिलालेखांचा समावेश होतो. त्याचबरोबर राधानगरी धरणाची प्रतिकृती तसेच धरणाचे नकाशे महाराजांचे दुर्मिक फोटो, त्या काळातील छ. शाहू महाराजांची पत्र व्यवहार इत्यादी माहिती इथे मिळू शकते.
कसं जायचं -मुख्य बसस्थानक - दसरा चौक - ताराराणी चौक- डी.वाय. पाटील आर्किटेक्चर कॉलेज- लक्ष्मी विलास पॅलेस (४ किमी)कलातपस्वी भालजी पेंढारकर
कलातपस्वी भालजी पेंढारकर यांनी मराठी सिनेसृष्टीत मोलाची कामगिरी बजावली होती तसेच मराठी चित्रपट सृष्टीच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावली होती अशा या कलातपस्वी भालजी पेंढारकर यांच्या सृतीप्रीत्यर्थ्य महावीर गार्डनला लागून असलेल्या कला प्रबोधीनी या संस्थेच्या दुस-या मजल्यावर एक छोटीशी आर्ट गॅलरी सुरु करण्यात आली आहे. इथे त्यांनी योगदान दिलेल्या चित्रपटांचे पोस्टर्स, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांनी लिहलेली चित्रपटांची स्क्रिीप्ट्स इ. त्यांच्या आयुष्यातील इतर गोष्टींचा इथे संग्रह आहे.
*कसं जायचं - मुख्य बसस्थानक - महावीर गार्डन (१.५ किमी)वि.स. खांडेकर -स्मृती संग्रहालय साहित्याकाचे भारतातील एकमेव संग्रहालय
मराठी साहित्यास भारतीय ज्ञानपीठाचे पहिले पारितोषिक मिळवून देवून वि.स. खांडेकरांनी मराठी भाषा व साहित्यास राष्ट्रीय मान्यता मिळवून दिली. अशा या साहित्य सम्राटाचे जीवन व कार्य मूर्त करणारे वास्तू संग्रहालय शिवाजी विद्यापीठाच्या वि.स.खांडकर भाषा भवनामध्ये उभारले आहे. या संग्रहालयात वंशवृध्द, जन्मघर, बालपण, त्यांना प्रभावीत करणारे लेखक, शिरोड्यातील अध्यापन कार्य, साहित्य सप्तपदी, चित्रपट सृष्टी, जीवनातील अविस्मरणीय छायाचित्रे, समग्र साहित्य संपदा पुरस्कार, पदव्या, हस्त लिखिते, गौरव ग्रंथ अशा वस्तू प्रदर्शित केल्या आहेत.
*कसं जायचं - मुख्य बसस्थानक- छ. शिवाजी युनिर्व्हसिटी - वि.स.खांडेकर भवन (५ किमी)