पन्हाळ गडाच्या पश्चिमेस सुमारे ८ किमी पायी चालण्याच्या अंतराव इतिहासाच्या वारसा सांगणारे मसाई पठार आहे. येथे गाडीमार्गे जाण्यासाइी पन्हाळ्याच्या बुधवार पेठेतून या मार्गे जावे लागते. या पठारावर गेल्यावर विस्तीर्ण असा सपाट भाग दिसतो. जांभ्या खडकांतील या पठारांची रुंदी ३०० ते ८०० फुट असून सभोवती ५०० ते ६०० फुट खोल दरी आहे. पठाराचे एकूण क्षेत्र जवळपास ९०० एकर आहे. पठारावर मसाईदेवीचे मंदिर असून या देवीवरुनच या पठाराला मसाईपठार हे नाव पडले असे मानतात.
*कसं जायचं - कोल्हापूर शहर - बुधवार पेठ (पन्हाळा) - मसाई पठार (३० किमी.)लेणी/ पठारे
इतिहास अभ्यासक प्राचीन इतिहास जाणून घेण्यासाठी प्राचीन गुहा व लेण्यांना भेटी देत असतात त्यातून त्यांना तत्कालिन इतिहास जाणून घेण्यात मदत होते. इतिहास अभ्यासकांशिवाय अनेक पर्यटकसुध्दा पर्यटनांसाठी प्राचीन लेण्यांना आवर्जून भेटी देत आहेत. कोल्हापूरात मसाई, पोहाळे, पळसंबे इत्यादी लेणी तर मोरजाई, मसाई इत्यादी पठारे पर्यटनांसाठी उत्कृष्ठ आहे.मसाई लेणी
मसाई पठारावर मसाई देवी मंदिराच्या उत्तरेला अर्धवर्तळाकार कड्यामध्ये बौध्दकालीन लेणी आहेत. येथील गुहेतून पाणी वाहत असल्याचा आवाज येतो. या लेणी दुस-या ते तिस-या शतकाच्या दरम्यानच्या आहेत. या ठिकाणी दोन मोठ्या व तीन लहान गुहा असून एक भुयारी मार्ग आहे. मोठ्या गुहेत एक पडवी, एक मोठे माजघर व आतमध्ये एक छोटी खोली असून गोलाकार स्तूप आहे. यावरील छत सपाट आहे. जांभ्या दगडातील या गुहा ओंबडधोबड स्वरुपात खोदल्या आहेत. या ठिकाणी असणारा भुयारी मार्ग मसाई देवळाखालून बाहेर जातो. हा मार्ग अनेक गुहांनी बनला आहे.
कसं जायचं - कोल्हापूर शहर - बुधवार पेठ (पन्हाळा) मसाई पठार - मसाई लेणी (५० किमी)बौध्दकालीन पोहाळे लेणी
कोल्हापूरापासून उत्तरेला जोतीबा डोंगराच्या पायथ्याशी पोहाळे गावाजवह जांभ्या दगडात खोदलेल्य उत्कृष्ट गुहा आहेत. ही लेणी पाच विभागत कोरलेली असून लेण्याच्या डाव्या बाजूस दोन नैसर्गिक झरे आहेत. झ-यांच्या उजव्या बाजूस १० फुट लांबी रुंदीच्या दोन खोल्या आहेत. दोन तीन चैत्यगृह, पाठशाळा आणि कांही खोल्या असा गुहांच्या परिसर असून गुहेमध्ये प्रचंड गारवा अनुभवता येतो. पावसाळ्यात गुहेच्या वरील भागातून हलका धबधबा कोसळू लागतो तेंव्हा अधिक आकर्षक असे वातावरण इथे तयार होते.
कसं जायचं -कसं जायचं –कोल्हापूर शहर - पंचगंगा नदी पुल ओलांडून पुढे डाव्या हाताच्या पेट्रोलपंपापासून उजव्या हातास वळण - वडणगे - निगवे - पोहाळे - पोहाळे लेणी (१५ किमी)अखंड खडकातील अप्रतिम गुंफास्थान, पळसंबे लेणी
कोल्हापूर गगनगड मार्गावर सुमारे ४० ते ४५ किमी अंतरावर आसळज गावाच्या थोडं पुढे पळसंबे गावाचा फाटा लागतो. तेथून आत साधारणतः १५ मिनीटात आपण पळसंबे लेणी येथे पोहचतो. इथे एक गगनगिरी महाराजांचा आश्रम पण आहे. इथून पुढेच आपणांस खाली उतरण्यासाठी पाय-या दिसतात. या पाय-यावरुन खाली उतरल्यावर जे काही दृश्य दिसते ते केवळ अवर्णनीयच आहे. इथलं वातावरण अतिशय लोभसवाण वाटतं.
*कसं जायचं - कोल्हापूर शहर - गगनबावडा रोड - आसळज - पळसंबे - पळसंबे लेणी (५० किमी.)मोरजाई गुंफा
मोरजाई पठारावर पोहचल्यावर काही अंतर चालल्यावर लांबून आपणांस मोरजाई गुंफा परिसर दिसतो. जवळ पोहचल्यावर अनेक अवशेष पाहता येतात. जांभा दगडातील दिपमाळसदृश्य तसेच समाधीसदृश्य खडक पाहायला मिळतो. बाजूलाच एक पाण्याचे टाके सुध्दा आहे. गुहेत प्रवेश केल्यावर मस्त गारवा जाणवतो. या गुहेत मोरजाई देवीचे मंदिर आहे. ही गुहा मुख्य असून सर्वात मोठी आहे. इथे आपणांस काही खांब पहायला मिळतात. तसेच एका ओळीने ठेवलेले वीरगळ तसेच सतीशिला व इतर शिल्पकृती पहायला मिळतात.
*कसं जायचं - कोल्हापूर शहर - गगनबावडा रोड - सांगशी गाव - बोरबेट - मोरजाई पठारअप्रतिम जांभा दगडांचा सडा - मोरजाई पठार
मोरजाई पठाराची माहिती मिळाल्यावर मोरजाई पठार म्हणजे काय असेल याची माहिती नव्हती. ज्यावेळी मोरजाई पठाराजवळ पोहचलो त्यावेळी काही पाय-या व पुढे थोडी चढण चढून जावे लागले. थोडीसी दमछाक करणारी चढण चढून ज्यावेळी आम्ही पठारावर आलो त्यावेळी आवाकच झालो. एैन उन्हाळ्यातसुध्दा हे पठार अतिशय सुंदर दिसत होतं ते तेथील जांभ्या दगडाच्या सड्यामुळे असं वाटत होत की छोट्या छोट्या दगडांचा पाऊस पडला होता.
*कसं जायचं - कोल्हापूर शहर - गगनबावडा रोड - सांगशी गाव - बोरबेट - मोरजाई पठार