अभयारण्ये

कोल्हापूरला फार मोठ्या प्रमाणात जैवविविधता लाभलेली आहे. अभयारण्यात केलेली सफर अविस्मरणीय ठरते ती तेथील विविध प्राणी, पक्षी, नानाविध वृक्षराजी व निसर्गाला अगदी जवळून पाहिल्याच्या अनुभवामुळेच. कोल्हापूरात राधानगरी अभयारण्य तसेच त्यामधील दाजीपूर गवा अभयारण्य आणि कोल्हापूरच्या सीमेवरील चांदोली अभयारण्य ही जगप्रसिध्द अभयारण्ये इथे पर्यटकांच्या दिमतीला उभी आहेत.
Standard Post with Image

दाजीपूर गवा अभयारण्य, राधानगरी

कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपुरचे गवा अभयारण्य हे एक पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. 'गवारेडा' या वैशिष्ट्यपूर्ण जनावरासाठी या अरण्याची महाराष्ट्रात ख्याती आहे. या अरण्यात गव्यांचा कळपच्या कळप आढळतो. छत्रपती शाहु महाराजांनी शिकारीसाठी राखून ठेवलेल्या या जंगलाचे पूढे दाजीपूर गवा अभयारण्यात रुपांतर करण्यात आले. दाजीपूर अभयारण्यामध्ये राधानगरी धरण व काळम्मावाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र येत असल्याने या भागातील जंगल अतिशय घनदाट बनले आहे.

*कसं जायचं - कोल्हापूर शहर - राधानगरी - दाजीपूर अभयारण्य (८० किमी)

चांदोली अभयारण्य, चांदोली

चांदोली अभयारण्य कोल्हापूर, सांगली, सातारा व रत्नागीरी या चार जिल्ह्याच्या सदहद्दीवरील परिसरात वसले आहे. कोल्हापूर शहरातून १०० किमी अंतरावरील हे अभयारण्य ३१७.६७ चौ.किमी क्षेत्रात पसरलेले असून हा भारतातील महत्वाचा प्रकल्प आहे तसेच येथे समृध्द अशी जैवविविधता आढळते. वाघांचा वावर असलेल्या या परिसरात व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषीत करण्याबरोबरच युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

विविध प्रकारची झाडे, औषधी वनस्पती, वृक्षवेली, विविध प्राणी या सर्वांमुळे चांदोलीचे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. या अभयारण्यात गवा, सांबर, गेळा, अस्वल, तरस, भेकर, साळिंदर, खवले मांजर, रानकुत्रा, रानडुक्कर, कोल्हा असे विविध प्राणी तर रानकोंबडे, घार, घुबड, मोर, गरुड असे विविध पक्षी तसेच येथील जंगलात आंबा, जांभूळ, फणस, हिरडा, आवळा, कडूलिंब यासारख्या वनस्पती व औषधी वनस्पतीही आढळतात.

*कसं जायचं - पन्हाळा - पराशर गुहेपासून पूढे - पावनगड, २ किमी
Made Packages For You. Start Making Your Travel Plans Check Out here