गड आणि किल्ले

महाराष्ट्राच्या संरक्षार्थ जसा सह्याद्गी पर्वतरांगेचा सिंहाचा वाटा होता तसेच महाराष्ट्रातील किल्ल्यांनी सुध्दा संरक्षणामध्ये मोलाची कामगिरी बजावली होती. छ. शिवरायांना किल्ल्याचे महत्व माहित होते, त्यामुळे त्यांनी आपल्या हयातीत अनेक किल्ले वसविले. कोल्हापूरात पन्हाळा, रांगना भुदरगड इत्यादी १३ किल्ल्यांचा समृध्द वारसा, इतिहास प्रेमी व गडप्रेमींसाठी खुला आहे.
Standard Post with Image

छ. शिवरायप्रिय पन्हाळा - (समुद्गसपाटीपासून ९५३ मी उंच)

कोल्हापूरातील हा महत्वाचा किल्ला छ. शिवरायांचा आवडीचा किल्ला होता. १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केल्यानंतर अवघ्या १८ दिवसांत महाराजांनी प्रतापगडापासून पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. २८ नोंव्हेंबर १६५९ इ. रोजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला.

*कसं जायचं- कोल्हापूर शहर- रत्नागिरी रोड- पन्हाळा, २० किमी
Standard Post with Image

पन्हाळ्याचा संरक्षक - पावनगड (समूद्गसपाटीपासून ९५३ मी)

छ. शिवरायांनी पन्हाळा गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने त्याच्या बाजूच्या डोंगरावर हा किल्ला बांधून घेतला. त्यामुळे पूर्वी शत्रू सैन्य पन्हाळा समजून पावन गडावर हल्ला करायचे. येथील शिबंदी त्यांना कडवा प्रतिकार करायचे. त्यामुळे शत्रु सैन्याचे श्रम व वेळ वाया जात असे. त्यामुळे शत्रु सैन्याला पन्हाळा सहजासहजी घेत येत नसे यातून छ. शिवरायांची दूरदृष्टी दिसते.

*कसं जायचं - पन्हाळा - पराशर गुहेपासून पूढे - पावनगड, २ किमी

इतिहास प्रसिध्द किल्ला - रांगणा (समुद्गसपाटीपासून ६७९ मी उंच)

रांगणा किल्ल्याची उपयुक्तता सांगणारे कित्येक पुरावे आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रात ठिकठिकाणी पहायला मिळतात. अशाच एका १७८१ सालच्या एका एैतिहासिक पत्रात रांगण्याचे महत्व सांगणारे एक विधान अतिशय मार्मिक आहे. एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल या वाक्यावरुनच रांगणा किल्ल्याचे महत्व लक्षात येते. हा किल्ला कोल्हापूर पासून जवळपास १०० किमी अंतरावर असून एक जबरदस्त अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.

*कसं जायचं- कोल्हापूर- गारगोटी - कडगांव - पाटगांव - भटवाडी - रांगणा,१०० किमी.
Standard Post with Image

नावाप्रमाणे विशाल असा विशाळगड - समुद्गसपाटीपासून १०२१ मी उंच

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यापैकी समुद्गसपाटीपासून सर्वात उंचीवर वसला आहे. याचं आकारमान प्रचंड आहे. म्हणूनच याचं नाव विशाळगड ठेवलं असावं. इथे मलिक रेहानचा दर्गा असून तो फार प्रसिध्द आहे. विशाळगडावरील अक्राळ विक्राळ द-या व द-यातून वाटणारा भन्नाट वारा, अनुभवण्यासारखा आहे. आज या गडावर वीर बाजीप्रभू व फुलाजी प्रभू देशपांडे या बंधुंच्या समाध्या, मारुती मंदिर, गणेश मंदिर, भगवंतेश्वर मंदिर, मुंढा दरवाजा, विठ्ठल रुक्माई, पंत प्रतिनिधींचा वाडा, अर्धचंद्ग विहीर, रणमंडळ टेकडी, नरसोबा मंदिर, राममंदिर, कोकण दरवाजा, घोड्याच्या टापा, सतीशीळा, शिव छत्रपतींचे पुत्र छ. राजाराम महाराज यांच्या पत्नी अंबिकाबाई यांची समाधी अशा अनेक ऐतिहासिक महत्व असणा-या गोष्टी आहेत.

*कसं जायचं - कोल्हापूर शहर - मलकापूर - पांढरेपाणी - टेंभूर्णीवाडी-गजापूर-विशाळगड, ८० किमी.
Standard Post with Image

प्रेक्षणीय गगनबावडा - (समुद्गसपाटीपासून ६९१ उंच)

कोल्हापूरच्या पश्चिमेला गगनबावड्यात ६० किमी अंतररावर हा किल्ला वसलेला आहे. घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती केली गेली. या किल्ल्यावर गगनगिरी महाराजांचा मठ व मंदिर, बालेकिल्ला, म्हसोबा मंदिर, विठ्ठलाई देऊळ चौथरा, गैबी दर्गा मंदिर, राजवाड्याचे अवशेष इत्यादी ठिकाणे पाहता येतात.

*कसं जायचं -कोल्हापूर - गगनबावडा - गगनगड, ६० किमी
Standard Post with Image

भक्कम नैसर्गिक संरक्षण रचनेचा पारगड (समुद्गसपाटीपासून ७३८ मी उंच)

कोल्हापूरातील चंदगड तालुक्यातील ४ किल्ल्यांपैकी हा एक महत्वाचा किल्ला आहे. चंदगडमधून पारगडकडे जाणारा जाताना होणारा प्रवास हा तिथल्या निसर्गरम्य वाटेमुळे अविस्मरणीय ठरतो. सकाळी जर लवकर निघालात तर अनेक नानाविध किलबिलाट करणारे पक्षी, रानटी कोंबड्या, मुंगुस, मोर, साप इ. प्राणी सहज दिसू शकतात.

*कसं जायचं - कोल्हापूर - चंदगड - हेरे - इसापूर - पारगड, १५० किमी.
Standard Post with Image

आटोपशिर पण मस्तच - कलानिधीगड (समुद्गसपाटीपासून उंची १०१५ मी)

निसर्ग रम्य चंदगड तालुक्यातील ४ किल्ल्यापैकी हा दुसरा किल्ला असून किल्ल्याचा डोंगर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे पर्यटकांचे लक्ष आपसूकच आपल्याकडे वेधून घेतो.या किल्ल्याचे नाव कलानिधीगडच पण स्थानिकांमध्ये बहुतांशी लोक या किल्ल्याला काळानंदी गड म्हणूनच ओळखतात.

*कसं जायचं - कोल्हापूर शहर - चंदगड - हेरा - पाटणेमार्गे - कलानंदी गाव - कलानिधी गड, १४० किमी
Standard Post with Image

अप्रतिम विहीर आणि गुहांची सफर- महिपालगड (समुद्गसपाटीपासून उंची ९८२ मी.)

कोल्हापूरच्या दक्षिणेकडील चंदगड तालुक्यातील ४ किल्ल्यांपैकी हा ३ रा किल्ला. आज किल्ल्यावर काताळात खोदून तयार केलेली ७० फुट लांब तर ४० फुट रुंद व प्रचंड खोली असलेली विहीर पाहण्यासारखी आहे. तसेच जांभ्या दगडात खोदलेली प्राचीन गुहा नक्की पहावी अशीच आहे. त्याचबरोबर वैद्यनाथ मंदिर, शिलालेख, गोळदेव, अंबाबाई मंदिर, गणेश दरवाजा, तटबंदी, बुरुज, दगडी भांडी इत्यादी अवशेष इथे पहाता येतात.

*कसं जायचं - कोल्हापूर शहर- बेळगांव रोड - यमुनापूर गांवातून उजव्या हातास वळण - शिणोळी फाटा - देवरवाडी - महिपालगड, १२७ किमी
Standard Post with Image

दुर्लक्षीत गंधर्व गड - समुद्ग सपाटीपासून उंची, ९१६ मी

कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील हा ४ था आणि शेवटचा किल्ला आहे. या किल्ल्यावर फार कमी अवशेष पहायला मिळतात. तसं पहायला गेलं तर हनुमानाची मूर्ती, २ विहीरी ३-४ चोर दरवाजे, शेवटच्या घटका मोजणारे बुरुज, क्वचित तटबंदी येथे पहायला मिळते.

*कसं जायचं - कोल्हापूर शहर - चंदगड - वळकुळी फाटा - गंधर्वगड (१०५ किमी)
Standard Post with Image

अवशेष संपन्न भव्य किल्ला - भुदरगड- (समुद्गसपाटीपासून उंची ९७८ मी.)

कोल्हापूरच्या दक्षिणेला असणा-या गारगोटी गावाजवळ हा किल्ला आहे. या अवशेष संपन्न किल्ल्याला भेट देणे म्हणजे एक सुखद अनुभव आहे. या किल्ल्यावर भैरवनाथ मंदिर पालखी चौथरा, ध्वज बुरुज, दिपमाळा, भक्कम तटबंदी, कचेरी, शिवमंदिर, इतिहासाची साक्ष देणारी तोफ, भवानी व महादेव मंदिर, गडसदरेचे अवशेष, जांभ्या दगडातील वाडा, अप्रतिम दुधसागर तलाव, जखुबाई गुहामंदिर, पोखर धोंडी (पहारेक-यांची १० बाय १० फुट खोदलेले जांभ्या दगडातील शिळा) इत्यादी अवशेष आपणांस पाहता येतात.

*कसं जायचं -कोल्हापूर- कळंबा- गारगोटी- पुष्पनगर -शिंदेवाडी-राणेवाडी -पेठ शिवापूर- भूदरगड किल्ला (५० किमी.)

प्रेक्षणीय विहीरी असलेला - सामानगड, (समुद्गसपाटीपासून ९१६ मी. उंच)

कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यात सामानगड किल्ला वसला आहे. नावाप्रमाणे याचा वापर सामान ठेवण्यासाठी म्हणजेच युध्द साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी केला जायचा. या किल्ल्यांच्या बाजूने भुदरगड इत्यादी किल्ल्यांमुळे हा किल्ला सुरक्षित होता. या किल्ल्यास जाण्यासाठी कोल्हापूरहून ५५ किमी अंतर कापावे लागते. आज या किल्ल्यावर नवीन बांधलेला प्रवेशव्दार निशानी बुरुज, जांभ्या दगडातील विहीरी, कमानबाव, गडदैवता अंबाबाई, विहिर संकुले, कातळ दगडाचे भुयार, चोर दरवाजा, सोंड्या बुरुज, मुघल टेकडी, हनुमान मंदिर व लेणी, तटबंदी इत्यादी विविध वास्तु गडावर पहायला मिळतात.

*कसं जायचं - कोल्हापूर शहर - गडहिंग्ल - सामानगड
Standard Post with Image

घनदाट अरण्यातला - शिवगड (समुद्गसपाटीपासून उंची - ७२८ मीटर)

तर अशा या किल्ल्यावर आज काही बुरुज, एक अप्रतिम सतीशिळेचा सुंदर पाषाण, दुहेरी तटबंदी, भग्न प्रवेशव्दार, लांबलचक तट, कुंड व किल्ल्यांवरील विस्तीर्ण माळ पहायला मिळतो. जरी इथे अवशेष कमी असले तरी या किल्ल्यावर भटकायला विलक्षण आनंद मिळतो. जेंव्हा आपण जंगलातून वाट काढत इथे पोहचतो तेंव्हा काहीतरी वेगळं केल्याची भावना निर्माण होते, भारी वाटतं. किल्ल्यावरुन खाली पाण्याचा मोठा जलाशय दिसतो तो लय भारी असाच आहे.

*कसं जायचं - कोल्हापूर शहर - फोंडा घाट - राधानगरी - दाजीपूर अभयारण्य - शिवगड, (८० किमी.)

कार्जिडा घाट परिसरातील मुडागड, (समुद्गसपाटीपासूनची उंची ६९८ मीटर)

कोल्हापूरच्या पश्चिमेला ४५ किमी अंतरावर पडसाळी गावाच्या दक्षिणेला कार्जिडा घाट परिसरात हा गड आहे. याच कार्जिडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मुडागडाची निर्मिती केली होती. किल्ल्याला जाताना शक्यतो स्थानिकाची मदत घ्यावी. संपूर्ण गडच जंगलाच्या भक्षस्थानी पडला आहे. आज या गडावर तटबंदीचे जांभे दगड, जंगली झाडे व वनस्पतींनी व्यापलेले चौथरे एवढ्याच वास्तू इथे आहेत. त्यामुळे फक्त हौशी व खरे किल्लेप्रेमीच इथे भेट देतात.

*कसं जायचं - कोल्हापूर शहर - कळे - बाजारभोगाव - कोलिक - पडसाळी - मुडागड
Made Packages For You. Start Making Your Travel Plans Check Out here