सोनेरी सुर्यास्त
पर्यटक दिवसभर विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्यानंतर सुर्यास्तावेळी पर्यटक शांत निवांतपणा अनुभवण्यासाठी सनसेट पॉईंटकडे धाव घेत असतात. सुर्यास्ताची मजा काही औरच असते. कोल्हापूरात असेच भान हरपून पाहण्यासारखे सनसेट पॉईंटस् आहेत. सातेरी, सोनतळी, शिदोबा डोंगर, रंकाळा, चंबूखडी येथील सुर्यास्त समईचे शोभा ती काय वर्णावी इथले सनसेट पॉईंटस् ग्रेटच आहेत.